नृत्यांगना गौतमी पाटील थाटामाटात दिवाळीचा सण साजरा करताना दिसत आहे. नुकतीच तिने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. गौतमीचा मराठमोळा साज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
लाल साडी आणि पारंपरिक साज
गौतमीने लाल रंगाची आकर्षक साडी नेसली आहे. साडीच्या काठावर क्रीम आणि सोनेरी रंगाची नक्षीदार भरतकामाची बॉर्डर आहे. साडीला गुलाबी आणि जांभळ्या छटेचा ब्लाउज परिधान केला आहे. त्यावर चंदेरी रंगाची नक्षी दिसत असून, हा ब्लाउज तिच्या पारंपरिक लूकला वेगळा टच देतो.
गौतमीने लांबसडक, काळे आणि सरळ केस मोकळे सोडले आहेत. मधून भांग पाडून केसांची हेअरस्टाइल केली आहे. कपाळावर लाल कुंकू लावले आहे. हलका मेकअप, आकर्षक डोळे आणि चेहऱ्यावरील गोड हास्य यामुळे लूक अधिक मनमोहक दिसतो.
नाकात सुंदर नथ घातली आहे, यामुळे महाराष्ट्रीयन लूकची खासियत वाढते. हातात लाल रंगाच्या बांगड्या, सोनेरी बांगड्या आणि पिवळ्या रंगाचे ब्रेसलेट दिसत आहे. हे दागिने तिच्या साडीच्या रंगाशी छान जुळतात.
फुलझडी आणि पणतीसह फोटो
फोटोंमध्ये गौतमी दिवाळीचा आनंद घेताना दिसत आहे. तिच्या हातात फुलझडी आहे. तसेच दुसऱ्या फोटोत हातात मातीची पेटलेली पणती धरून ती पोज देताना दिसत आहे. घरात दिवाळीची भन्नाट सजावट केलेली पाहायला मिळत आहे.
कमेंट्समध्ये चाहते गौतमीच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत. तसेच तिला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. शुभ दीपावली, खूप सुंदर दिसत आहेस अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
गौतमी पाटील या महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना आणि अभिनेत्री आहेत. लावणी, मराठी गाणी आणि सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ यांमुळे त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली आहे. दमदार नृत्यशैलीमुळे तिचा मोठा चाहतावर्ग झाला आहे. गौतमी पाटील आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. अलिकडेच गौतमी पाटील कोण होणार करोडपतीच्या मंचावर दिसली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply