पुण्याच्या दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या घराला फायनान्स कंपनीने लावलेले सील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडून टाकले आहे. फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्याच्या घराला सील लावण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्याला कुटुंबासहित ऐन दिवाळीत उघड्यावर राहण्याची वेळ आली होती. शिक्षण घेत असलेल्या दोन मुलींच्या डोळ्यात अश्रू होते.
शेतकरी विभागाच्या प्रमुखांची मदत
परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा शिवसेना शेतकरी विभागाचे जिल्हाप्रमुख रामदास दोरगे यांनी या कुटुंबाला आनंदाचा शिधा दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांसह शेतकऱ्याच्या घराला लावलेले सील तोडण्यात आले.
फायनान्स कंपनीवर कारवाईची मागणी
फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. सील तोडल्यामुळे कुटुंबाला दिवाळीत मोठा दिलासा मिळाला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply