रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

स्वखुशीने निर्णय नाही; ओमराजेंनी सांगितले पक्षांतराचे कारण

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय स्वखुशीने घेतला नसल्याचे सांगितले. स्थानिक संस्थांतील पराभव हे कारण त्यांनी दिले.

स्वखुशीने निर्णय नाही; ओमराजेंनी सांगितले पक्षांतराचे कारण

ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चौफेर टीका झाली. ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओमराजेंची ओळख होती, मात्र त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. विरोधात राहून विकासकामे होत नसल्याचे कारण त्यांनी त्यावेळी दिले होते. आता पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे.

माणूस निर्णय घेतो तेव्हा काहीतरी घडलेले असते. वेगळा निर्णय स्वखुशीने कोणी घेत नाही, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, एकही नगरपालिका येण्याइतके आपले काम वाईट असेल का, एकही पंचायत समिती न येण्याइतके आपले काम वाईट होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण रोज लोकांमध्ये असल्याचे सांगत आपल्यासारखे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी याचा काय अर्थ काढायचा, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दोन्ही शिवसेनेचे नेते वेगवेगळे आहेत. शिवसेना एकत्र झाली तर सामान्य माणसाचे भले होईल आणि सर्व कार्यकर्त्यांच्या भावना त्याच आहेत, असेही ओमराजे निंबाळकर यावेळी म्हणाले.

दुष्काळाची स्थिती गंभीर

राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर असून या कालावधीला एक वर्ष जाणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील लोकांवर कठीण प्रसंग असून मायक्रो फायनान्स कंपनीचे लोक लोकांच्या दारातून हालत नाहीत, असे त्यांनी नमूद केले. त्यांना सक्तीने वसुली करू नका, कुणाला अडवून पैसे मागू नका, असे आपण नम्रपणे सांगितले असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. असे कोणी त्रास देत असेल, अर्वाच्च भाषा वापरत असेल तर फोन करून सांगा, त्याच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाईल, असे आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

शेतकऱ्यांना आवाहन

दिवस सारखे नसतात. कधी सुख असते तर दुःख असते. येणारा प्रसंग जाणार आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले. १९७२ चा दुष्काळही महाभीषण होता आणि लोकांनी त्या परिस्थितीवरही मात केली आहे. येणाऱ्या परिस्थितीवर तोंड देणे हाच पुरुषार्थ आहे. आपण टोकाचे पाऊल उचलल्याने समस्या सुटत नाहीत. त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंतीही त्यांनी शेतकरी बांधवांना केली आहे.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance