दिवाळीचा सण असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार असून, शेतांची पाहणीही करणार आहेत.
कोहळी गावात शेतांची पाहणी
आज, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास मुख्यमंत्री नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील कोहळी गावात काही शेतांची पाहणी करणार आहेत. त्याआधी सकाळी साडेनऊ वाजता नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा गावात सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत.
खोरी जलसिंचन प्रकल्पाकडे लक्ष
या दौऱ्यात मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ दिल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply