रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सोलापुरात अन्न प्रशासनाची कारवाई: १४,८५२ किलो साठा जप्त

सोलापूर जिल्ह्यात अन्न प्रशासनाने २५ आस्थापनांची तपासणी करून ६९ नमुने घेतले. कमी दर्जाचा संशय आल्याने ३२ लाख ५६ हजार रुपयांचा १४,८५२ किलो साठा जप्त करण्यात आला.

सोलापुरात अन्न प्रशासनाची कारवाई: १४,८५२ किलो साठा जप्त

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी सोलापूर जिल्ह्यात अन्न प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबविली आहे. २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध २५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आणि अन्नपदार्थांचे ६९ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. कमी दर्जाचा संशय आल्याने ३२ लाख ५६ हजार ४०९ रुपये किमतीचा १४ हजार ८५२.६ किलो साठा जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत खाद्यतेल, मिठाईचे पदार्थ, खवा, क्रीम, पनीर, पेढा, नमकीनचे पदार्थ आणि मसाले आदींचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

चार आस्थापनांवर कारवाई

अक्कलकोट शहरातील पिरजादे प्लॉट येथील मे. रांगोली स्वीट मार्टची तपासणी करून पेढा आणि स्वीट हलवा या अन्नपदार्थांचे दोन नमुने घेण्यात आले. यावेळी कमी दर्जाचा संशय आल्याने २ लाख ५० हजार २० रुपये किमतीचा ८२९ किलो साठा जप्त करण्यात आला. सांगोला येथील महूद रोडवरील मे. श्रीराज ॲग्रो टेकची तपासणी करून तेलाचे तीन नमुने घेण्यात आले. याठिकाणी ६ लाख २९ हजार ३६० रुपये किमतीचा ३ हजार १४६.८ किलो साठा जप्त करण्यात आला.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावमधील गावडेवाडी येथील मे. एस. जी. ट्रेडर्सची तपासणी करून तेलाचे तीन नमुने घेण्यात आले. याठिकाणी १० लाख ६० हजार ५९९ रुपये किमतीचा ६ हजार २३५.४ किलो साठा जप्त करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील मे. गणेश रामचंद्र आपटे प्रा. लि. या आस्थापनाची तपासणी करून क्रीम आणि पनीरचे चार नमुने घेण्यात आले. यावेळी ७ लाख १३ हजार ७०० रुपये किमतीचा २ हजार २१६ किलो साठा जप्त करण्यात आला.

नमुन्यांचे अहवाल प्रलंबित

आयुक्त तुकाराम मुंढे, पुणे विभागाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सोलापूरचे सहायक आयुक्त सा. ए. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ, रेणुका पाटील, मंगेश लवटे, गणेश कदम, कीर्तिदे देशमुख आणि उत्कर्ष एखंडे यांनी ही कारवाई केली. सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले की, दिवाळीच्या काळात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, वापरले जाणारे तेल, रंग आणि इतर घटकांच्या गुणवत्तेबाबत काटेकोर तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाकडून पुढेही अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात येणार असून अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे पालन करावे. तपासणीवेळी नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance