आल्याचा चहा अनेकांना आवडतो. मसालेदार आल्याचा चहा प्यायल्याने मन ताजेतवाने होण्यास मदत होते. मात्र चहा बनवताना आलं कधी टाकावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. आल्यामुळे चहाला चव येत असली तरी त्याचे प्रमाण आणि टाकण्याची योग्य वेळ महत्त्वाची आहे.
आल्याच्या चहाचे फायदे
सर्दी आणि खोकला यांसारख्या संसर्गजन्य आजारांवर आल्याचा चहा उत्तम मानला जातो. आल्याचा चहा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आल्याचा चहा पिण्याची सवय अनेकांना असते.
आलं कधी आणि कसे टाकावे?
अनेकजण आलं ठेचून चहामध्ये टाकतात. मात्र आलं किसून चहामध्ये घातल्याने आल्याचा स्वाद चहामध्ये चांगल्या प्रकारे मिसळतो. त्यामुळे आलं किसून वापरणे अधिक योग्य मानले जाते. चहा उकळण्याआधी की उकळल्यानंतर आलं टाकावे, याबाबतही योग्य वेळ पाळणे आवश्यक आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply