रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धुळे : सडगावी कीर्तन सोहळा; मेंढीचोरीची तक्रार

सडगाव येथे कीर्तनाचा सोहळा होणार आहे. कापडण्यात तीन मेंढ्यांची चोरी, दोन तरुणी बेपत्ता आणि पोलिस प्रशिक्षणार्थींच्या बसला अपघात झाल्याच्या घडामोडीही समोर आल्या.

धुळे : सडगावी कीर्तन सोहळा; मेंढीचोरीची तक्रार

सडगावला कीर्तनाचा सोहळा

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर जगन्नाथ गर्दे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त सडगाव येथे शनिवारी, ७ नोव्हेंबर रोजी कीर्तनाचा सोहळा होणार आहे. ‘जागर भाऊसाहेबांच्या आठवणींचा!’ या उपक्रमांतर्गत होणाऱ्या या सोहळ्यात शिवलिलाताई पाटील यांचे कीर्तन रात्री नऊ ते अकरा या कालावधीत होणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई मधुकर गर्दे, तुषार गर्दे आणि गणेश गर्दे यांनी केले आहे.

मेंढ्यांची चोरी

कापडणे शिवारात शेतात बांधलेल्या तीन मेंढ्या चोरट्याने नेल्याची घटना घडली आहे. या मेंढ्यांची किंमत दीड लाख रुपये आहे. याबाबत काशीनाथ दामोदर दगडे यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोहर पाटील यांच्या शेतात बांधलेल्या मेंढ्या चोरट्याने नेल्या. दोन नोव्हेंबरच्या रात्री साडेबारा ते तीन नोव्हेंबरच्या पहाटे चारदरम्यान ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन तरुणी बेपत्ता

सोनगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून २१ वर्षीय तरुणीला फूस लावून पळविल्याची फिर्याद तिच्या भावाने दिली आहे. दुसऱ्या घटनेत धुळे शहरातील चितोड रोड परिसरातून २५ वर्षीय तरुणीला चौदा ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास फूस लावून पळविल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवासी बसला अपघात; १५ जण जखमी

दिवाळीनिमित्त आपल्या गावी निघालेल्या धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या खासगी ट्रॅव्हल्सला कऱ्हाडजवळ अपघात झाला. या घटनेत तीन चालक आणि १२ प्रशिक्षणार्थी पोलिसांसह १५ जण जखमी झाले आहेत. धुळे शहरातील संतोषीमाता मंदिर ते लेनिन चौकदरम्यान पोलिस प्रशिक्षण केंद्र असून, तिथे भरती झालेल्या नवीन जवानांना नऊ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागतो. दिवाळीमुळे प्रशिक्षणार्थींना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे हे जवान खासगी आराम बसने आपल्या गावी निघाले होते. रात्री अडीचच्या सुमारास कऱ्हाड तालुक्यातील मसुदजवळ त्यांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाला. ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला होता, ज्यामुळे धुळ्याहून कोल्हापूरकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स मसुदमार्गे कऱ्हाडकडे जात होती. यादरम्यान हा अपघात घडला. मसुद पोलिसांनी सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी प्रशिक्षणार्थी हे सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागातील रहिवासी आहेत.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance