सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सांगलीतील एका सभेत पडळकर यांनी अफजल खानाचा कोथळा पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढल्याचा दावा केला होता. जयंत पाटील यांनी पडळकर यांची ही चूक दुरुस्त केली होती. या वादावर पडळकर यांनी आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील झोपले आहेत का, जागे आहेत का हे बघत होतो, असे पडळकर म्हणाले.
एकाच मंचावर जुंगलबंदी
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील एकाच मंचावर आले होते. या मंचावर दोन्ही नेत्यांमध्ये जुंगलबंदी पाहायला मिळाली. मंचावर पडळकरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यात आला. यावरून जयंत पाटील यांनी पडळकरांचा समाचार घेतला होता. या विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले होते.
पडळकरांचे प्रत्युत्तर
जयंत पाटील यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना पडळकर म्हणाले की, जयंत पाटील झोपले आहेत का जागे आहेत, हे मी पाहत होतो. जयंत पाटील यांना राजारामबापू पाटील यांचा इतिहास शिवाय दुसरा इतिहास माहीत नाही. कोणीही आम्हाला इतिहास शिकवण्याची गरज नाही, असेही पडळकर म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा टाकल्यावर त्यातून कसे बाहेर पडायचे, हे शिवाजी महाराजांनी शिकवले आहे. मला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेढा घातला होता. त्यातून मी बाहेर आलोच ना, असे पडळकर म्हणाले. हा जयंत पाटील फॉरेन रिटर्न आहे. अक्कल असती तर स्टेटमेंट केले नसते. सत्ता आल्यावर बघतो, असे जयंत पाटील म्हणतात. पण आम्ही तुम्हाला फाट्यावर बांधतोय. तुझी उद्या सत्ता आली तर आमचे काही वाकडे करणार नाही. गोपीचंद पडळकर डरपोक माणूस नाही. पोलिसांना शिव्या देत बसलेत. आम्ही सत्तेचा माज करत नाही. आम्ही काल जसे होतो, आजही तसेच असणार आहे, असे पडळकर म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply