बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कोतवाल पदभरती २०२६ : नाशिक जिल्ह्यात ४ हजार ६० अर्जांची छाननी पूर्ण; ३ हजार ३९ उमेदवार पात्र, १ हजार २१ अर्ज अपात्र

कोतवाल पदभरती २०२६ : नाशिक जिल्ह्यात ४ हजार ६० अर्जांची छाननी पूर्ण; ३ हजार ३९ उमेदवार पात्र, १ हजार २१ अर्ज अपात्र

नाशिक जिल्ह्यात महसूल विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कोतवाल पदभरती २०२६ प्रक्रियेला गती मिळाली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील कोतवाल पदांच्या भरतीसाठी प्राप्त झालेल्या एकूण ४ हजार ६० अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, त्यापैकी ३ हजार ३९ उमेदवार पात्र ठरले आहेत, तर १ हजार २१ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) कुंदन हिरे यांनी दिली.

जिल्ह्यात कोतवालांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या १५६ पदांच्या भरतीसाठी ३ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची पात्रता निकषांनुसार छाननी करण्यात आली आहे.

तालुकानिहाय प्राप्त अर्ज व पात्र-अपात्र उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

तालुका अर्ज पात्र अपात्र
इगतपुरी 221 182 39
कळवण 389 334 55
चांदवड 133 112 21
देवळा 108 79 29
दिंडोरी 343 279 64
नांदगाव 127 98 29
नाशिक 525 169 356
निफाड 254 141 113
पेठ 194 165 29
बागलाण 503 387 116
मालेगाव 279 223 56
येवला 203 180 23
सुरगाणा 486 457 29
सिन्नर 171 134 37
त्र्यंबकेश्वर 124 99 25
एकूण ४०६० ३०३९ १०२१

या छाननी प्रक्रियेत सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक ४५७ उमेदवार पात्र ठरले असून, बागलाण तालुक्यात ३८७ आणि कळवण तालुक्यात ३३४ उमेदवार पात्र ठरले आहेत. नाशिक तालुक्यात सर्वाधिक ५२५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १६९ अर्ज पात्र ठरले आहेत. सदरच्या याद्या तहसील, प्रांत कार्यालयात तसेच पोर्टलवर व एनआयसी संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

प्राप्त अर्जांची छाननी करताना उमेदवारांचे रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता तसेच भरतीसाठी निश्चित करण्यात आलेल्या अन्य आवश्यक अटींची तपासणी करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या अर्जांबाबत विहित निकषांनुसार कार्यवाही करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना पोर्टलवरून हॉल तिकीट दि. ५ नोव्हेंबर २०२६ ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत डाउनलोड करून घेता येतील. परीक्षा केंद्रावर हॉल तिकीट व ओळखपत्र मूळ प्रत घेऊनच प्रवेश करता येईल.

पात्र उमेदवारांची पुढील निवड प्रक्रिया पारदर्शकपणे आणि शासनाने निर्धारित केलेल्या नियमांनुसार राबविण्यात येणार असून, भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याबाबतची माहिती प्रशासनामार्फत अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance