कळवण तालुका शिवसेनेची आढावा बैठक अभोणा येथील अन्नपूर्णा लॉन्स येथे उत्साहात पार पडली. अभोणा, कनाशी, पुनदनगर आणि मानूर या जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. या वेळी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन आहेर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.
वाढती महागाई रोखण्यात देशातील आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप आहेर यांनी केला. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता बदलाचे वारे वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुका लक्षात घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा सहसंपर्कप्रमुख राजु पाटील, दिंडोरी लोकसभा प्रमुख कारभारी आहेर, विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र धनावडे आणि तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर
बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. विधानसभा संघटक म्हणून प्रकाश भालेराव, तालुका संघटक म्हणून अमजद खान आणि तालुका समन्वयक म्हणून संजय रौदळ यांची नियुक्ती करण्यात आली. कळवण उपशहरप्रमुख म्हणून विनोद मालपुरे, उपतालुकाप्रमुख म्हणून गिरिश गवळी, निलेश आहेर, आनिल पवार, तुळशिराम आहेर आणि डॉ. दिनेश बागुल यांची निवड झाली. विभाग प्रमुख म्हणून संदीप पाटील, जयवंत मोरे, संजय बागुल आणि मधुकर मोरे यांची नावे जाहीर झाली.
गणप्रमुख म्हणून विनोद पवार, संजय गायकवाड, काळु ठाकरे, बबन सोनवणे, सुरेश चौधरी आणि राजेंद्र महाले यांची नियुक्ती करण्यात आली. सप्तशृंगी गड शहर प्रमुख म्हणून तेजस बेनके, आभोणा शहरप्रमुख म्हणून पवन काकरे, शहरसंघटक म्हणून संजय पाटील, उपशहर प्रमुख म्हणून राजेंद्र हिरे आणि मनोज जाधव, कनाशी शहरप्रमुख म्हणून आरिफ सय्यद, सप्तशृंगी गड उपशहर प्रमुख म्हणून वैभव जहागीरदार आणि सप्तशृंगी शहर संघटक म्हणून अमोल गव्हाणे यांची नावे जाहीर करण्यात आली. याशिवाय तालुकाप्रमुख अंबादास जाधव, सर्जेराव सावंत, संभाजी पवार, विनोद भालेराव, माजी तालुकाप्रमुख भास्कर भालेराव, युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे, शहरप्रमुख अजय पगार, उपशहर प्रमुख विनोद मालपुरे, युवा सेनेचे शहराध्यक्ष सुनिल पगार आणि राजू वाघ हेही बैठकीला उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply