ग्राहकांचा विश्वास, दागिन्यांचा दर्जा आणि कलात्मकतेची परंपरा जपत दंडे गोल्ड अँड डायमंड्सने नाशिकच्या गोविंदनगर येथे आपल्या चौथ्या आणि आजवरच्या सर्वांत मोठ्या शाखेचा शुभारंभ केला आहे. या शाखेत ग्राहकांना स्वतःच्या पसंतीनुसार अंगठी तयार करून घेण्याची ‘रिंग स्टुडिओ’ ही अभिनव सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रिंग स्टुडिओ: मनपसंत अंगठी घडवण्याची सुविधा
रिंग स्टुडिओमध्ये ग्राहक धातू, हिऱ्याचा आकार आणि डिझाईन निवडून मनपसंत अंगठी बनवून घेऊ शकतात. नाशिकमध्ये प्रथमच अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा संस्थेने केला आहे. नव्या शाखेत सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल. पारंपरिक दागिन्यांसह आधुनिक डिझाइन्स, सोन्याची शुद्धता आणि व्यवहारातील पारदर्शकता हे संस्थेचे वैशिष्ट्य असल्याचे सांगण्यात आले.
१९२७ पासूनची परंपरा, घडणावळीवर सवलत
१९२७ मध्ये अमरावती येथे सुरू झालेल्या या सुवर्णपेढीने नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर येथे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यानंतर गोविंदनगरमधील नव्या शाखेच्या माध्यमातून संस्थेने आपल्या विस्ताराचे आणखी एक पाऊल टाकले आहे.
शुभारंभानिमित्त ३१ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरदरम्यान सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. लग्नसराई, सण-समारंभ आणि खास कौटुंबिक प्रसंगांसाठी दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे. आकर्षक डिझाइन्स आणि घडणावळीवरील भरघोस सवलतीचा लाभ घेण्यासाठी नाशिककरांनी या नव्या शाखेला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे संचालक अनिल दंडे आणि योगेश्वर दंडे यांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply