बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय गुप्ता यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वर्सोवा येथील राहत्या घरी बाथरूममध्ये घसरून पडल्याची माहिती समोर येत आहे.
घरचे झोपेत असताना घडली घटना
रात्री ही दुर्घटना घडली तेव्हा घरातील मंडळी झोपेत होती. त्यामुळे त्यांना या घटनेबाबत लगेच कळले नाही, अशी माहिती समोर येत आहे. बाथरूममध्ये घसरून पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
शूटआऊट ॲट लोखंडवाला चे दिग्दर्शक
संजय गुप्ता हे शूटआऊट ॲट लोखंडवाला या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply