टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या राष्ट्रीय संघाबाहेर आहे. सलग पाच वर्षे देशासाठी खेळल्यानंतर अचानक संघातून बाहेर राहणं त्याच्यासाठी सोपं नाही, हे त्याने स्वतःच मान्य केलं आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्याने मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या.
सूर्यकुमार म्हणाला की, संघापासून दूर राहणं वेदनादायी आहे. सलग पाच वर्षे देशासाठी खेळल्यानंतर अचानक भारतासाठी खेळता येत नाही, तेव्हा वाईट वाटणं स्वाभाविक आहे. मात्र खेळाचं हेच स्वरूप आहे, असंही त्याने सांगितलं.
अडचणीच्या काळातही आशा कायम
गेल्या दोन वर्षांत क्रिकेटने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या, असं सूर्यकुमार म्हणाला. आयपीएलनंतरही शिकण्यासारखं बरंच काही मिळालं. सुरंगाच्या शेवटी नेहमीच प्रकाश असतो, असं म्हटलं जातं. तोपर्यंत खेळ सुरू ठेवला पाहिजे, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
सध्या सूर्यकुमार सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत दोन अर्धशतकं झळकावली आहेत. सध्या आयपीएलबाबत फारसा विचार करत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. देशांतर्गत स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तो पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा