मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगावर आपला विश्वासच राहिलेला नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी आयोगाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ठाण्यातील मतदानावर संशय
ठाण्यातील एका मतदारसंघाचे उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले की, शेवटच्या एका तासात ८० ते ८५ हजार मतदान झाल्याचे समोर आले. हे शारीरिकदृष्ट्या कसे शक्य आहे, असा सवाल त्यांनी केला. या घटनेची निवडणूक आयोगाने तपासणी केल्याचा खुलासा केला असला, तरी राज ठाकरेंनी तो फेटाळून लावला आहे.
सत्ता आणि पैशाचे दुष्टचक्र
निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या ताब्यात असल्याचा आरोप करत, अशा परिस्थितीत जनतेला न्याय कसा मिळेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सर्व संस्था राज्यकर्त्यांच्या ताब्यात असतील, तर कुठून न्याय मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील सत्ता पैशाच्या जोरावर मिळवली जात असून, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे दुष्टचक्र सुरू असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा