डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना राहुल गांधी यांनी थेट इशारा दिला आहे. या विधेयकाला काँग्रेस पूर्ण ताकदीने विरोध करणार असून, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे राहुल गांधी यांनी पक्षाच्या रणनीती बैठकीत स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी वेगळी भूमिका घेतल्यास आघाडीतील राजकीय संबंधांचा फेरविचार करावा लागू शकतो, असे संकेतही काँग्रेसने दिले आहेत.
बैठकीत काय ठरले?
दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित होते. मित्रपक्ष वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेसने विशेष रणनीती आखली आहे. आघाडीतील ज्या पक्षांनी डिलिमिटेशनच्या समर्थनार्थ भूमिका घेतली, तर त्यांच्यासोबतच्या राजकीय संबंधांवर पुनर्विचार केला जाईल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
आघाडीत फूट पडण्याची शक्यता?
डीएमके आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतल्यास किंवा पाठिंबा दिल्यास काँग्रेस कठोर भूमिका घेऊ शकते. या घडामोडींमुळे इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी काळात मित्रपक्ष कोणती भूमिका घेतात, यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा