आज मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठा दिवस आहे. ज्या चाहत्यांनी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर प्रेम केलेलं, त्यांना आता पुन्हा एकदा मुंबईचा राजा हा टीमचे नेतृत्व करताना दिसणार आहे. होय, हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा एकदा आयपीएल टीम मुंबईचा कॅप्टन बनला आहे. आज अधिकृतपणे त्याच्या नावाची घोषणा फ्रँचायझीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे.
केवळ रोहितचे चाहतेच नाही, तर टीम मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानीही प्रचंड आनंदी झाल्या आहेत. त्यांनी रोहितला पुन्हा एकदा कॅप्टन्सी दिल्यावरुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या विसाव्या हंगामामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित बनला असल्याने सगळ्या मुंबईच्या पलटनमध्ये नवी उर्जा संचारली आहे. रोहित हा आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधार आणि खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे या नव्या हंगामात रोहित कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
## नीता अंबानी काय म्हणाल्या?
रोहित शर्मा हा जेव्हा अगदी युवा खेळाडू होता, तेव्हा तो मुंबई संघाशी जोडला गेला. आम्ही 2011 साली सर्वात आधी रोहितसाठी बोली लावली. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्स परिवाराचा सदस्य आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये रोहितने क्रिकेटर, चॅम्पियन, लीडर आणि एक उत्तम कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून कायम सुधारणा केल्या. हे सर्व मला पाहताना आनंद वाटतोय. एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून घडताना त्याला पाहणं हे माझं सौभाग्यच आहे, असं यावेळी नीता यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, रोहित शर्माला पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करताना पाहणं हा आम्हा सर्वांसाठी खास क्षण आहे. त्याने गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला अनेक अविस्मरणीय विजय दिले आहेत.
## 2011 पासून मुंबई इंडियन्सचा भाग
रोहित शर्मा 2011 पासून मुंबई इंडियन्सशी जोडलेला आहे. तेव्हापासून त्याने संघासाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये निर्णायक कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अनेक विजेतेपदं मिळवली आहेत. त्यामुळे त्याच्याकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय चाहत्यांनाही आवडला आहे.
आता आयपीएलच्या विसाव्या हंगामात रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स कशी कामगिरी करते, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा