अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने तिच्या आणि जॉन अब्राहम यांच्या लग्नाच्या जुन्या अफवांवर अखेर मौन सोडले आहे. या अफवा पूर्णपणे निरर्थक असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. खूप वर्षांनंतर तिने या विषयावर भाष्य केले असून नेमके काय घडले होते, हे तिने सांगितले आहे.
‘तो फक्त मूर्खपणा होता’
एका मुलाखतीत जिनिलियाने सांगितले की या अफवा म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. कोणीतरी मुद्दाम हा फालतू प्रसिद्धीचा डाव रचला होता, असे तिला वाटते. कारण अचानक कोणी येऊन लग्न झाल्याचे म्हणणार नाही, असे तिने म्हटले. ‘फोर्स’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते आणि त्यामुळे या अफवांना जोर मिळाला, इतकेच, असे तिने स्पष्ट केले.
‘गनमास्टर जी ९’मुळे चर्चेत
सध्या जिनिलिया तिच्या ‘गनमास्टर जी ९’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका चॅनेलला मुलाखत दिली होती. ‘गनमास्टर जी ९’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ‘वेड’ या चित्रपटातून तब्बल दहा वर्षांनंतर तिने पुनरागमन केले होते. त्यानंतर ती एकामागोमाग एक वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये काम करताना दिसत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा