ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. अज्ञात व्यक्तीने हा ई-मेल पाठवला असून, त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. धमकीची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने मुख्यालयाची संपूर्ण इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेतला.
कर्मचारी आणि नागरिक सुरक्षितस्थळी
इमारतीतील सर्व कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्या दोन्ही पथकांकडून मुख्यालय परिसरात कसून शोधमोहीम सुरू आहे.
धमकीचा ई-मेल कोणी पाठवला?
कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि धमकी कितपत खरी आहे याची खात्री करण्यासाठी ही शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, धमकीचा ई-मेल कोणी आणि कुठून पाठवला याचा शोध घेतला जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा