, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मेंढरांनी मिळवून दिली थार! सांगलीच्या दाजी थोरातांची कमाल

सांगलीच्या दाजी थोरात यांच्या मेंढरांनी महिंद्रा थार गाडी मिळवून दिली. आटपाडीच्या कार्तिकी यात्रेतील प्रदर्शनात त्यांच्या मेंढरांनी पहिला क्रमांक पटकावला.

मेंढरांनी मिळवून दिली थार! सांगलीच्या दाजी थोरातांची कमाल

मेंढरांनी थार गाडी मिळवून दिल्याची एक आगळीवेगळी बातमी सांगली जिल्ह्यातून समोर आली आहे. सांगलीतल्या दाजी थोरातांना मेंढरांचा नाद आहे. गावच्या जत्रेत त्यांनी मेंढरं नेली आणि त्याच मेंढरांनी त्यांना थेट महिंद्रा थार गाडी मिळवून दिली.

अनेकांना वाटेल की मेंढरं विकून गाडी घेतली असेल. पण तसं अजिबात नाही. थारसोबत मेंढरंही घरी परत आली. गुलालाचा धुरळा आणि धुराच्या कांड्यांमध्ये गाडीच्या बोनेटवर हातात फायर गन घेऊन उभे असलेले दाजी थोरात जल्लोष करताना दिसले. त्यांचे कपडे पार गुलालाने भरले होते.

जत्रेत काय झालं?

आटपाडीचं ग्रामदैवत उत्तरेश्वर यांच्या कार्तिकी यात्रेनिमित्त जातीवंत मेंढ्यांचं प्रदर्शन भरवलं जातं. सांगोला, आटपाडी आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले मेंढपाळ यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. या प्रदर्शनात दाजी थोरात यांच्या मेंढरांनी पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळेच त्यांना थार गाडी मिळाली.

दाजी थोरात यांनी कुठलीही निवडणूक जिंकली नाही, तर त्यांनी गाडी जिंकली आहे. तीही त्यांच्या मेंढ्यांमुळे. या जल्लोषाचं खरं मानकरी त्यांची देखणी मेंढरं आहेत.

दुसरा क्रमांक कुणाचा?

या प्रदर्शनात दुसरा क्रमांक सोमनाथ जाधव यांच्या मेंढरांनी पटकावला. त्यांचा बकरा हिंदकेसरी ठरला. सोन्यासारख्या बकऱ्याने सोमनाथ यांना तोळाभर सोन्याची चैन मिळवून दिली. वाघाच्या गळ्यात चैन बसावी, म्हणून त्यांनी ती चैन ट्रॉफीलाच घातली.

दुष्काळातही मेंढपाळांचं कौतुक होतंय, हीच मोठी गोष्ट आहे. पुढच्या वेळी थारऐवजी मर्सिडिज मिळो, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance