बिअर शाकाहारी आहे की मांसाहारी, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. बिअर तयार करण्यासाठी प्रामुख्याने पाणी, बार्ली, माल्टेड बार्ली आणि हॉप्स यांचा वापर केला जातो. त्यामुळे सामान्यपणे बिअर शाकाहारी असल्याचं मानलं जातं.
मात्र, काही बिअर कंपन्या बिअर स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी एका वेगळ्या पदार्थाचा वापर करतात. हा पदार्थ माशांपासून मिळतो. त्यामुळे बिअर शाकाहारी आहे की नाही, हा प्रश्न निर्माण होतो.
इजिंग्लास म्हणजे काय?
बिअर स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाला इजिंग्लास असं म्हणतात. हा पदार्थ माशांच्या स्विम ब्लॅडरपासून, म्हणजेच पोहण्याच्या पिशवीपासून मिळवला जातो. बिअरमधील अनावश्यक कण वेगळे करून ती स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी इजिंग्लासचा वापर केला जातो. या प्रक्रियेमुळे बिअर कमी वेळेत तयार करण्यासही मदत होते.
इतर प्राणिजन्य घटकही वापरले जातात
बिअरमध्ये इजिंग्लासशिवाय इतर प्राणिजन्य घटकांचाही वापर होऊ शकतो. काही पेयांमध्ये जिलेटिन, अंड्याच्या पांढऱ्या भागापासून तयार होणारं अल्ब्युमिन किंवा डुकरापासून मिळणारं पेप्सिन यांसारख्या घटकांचा वापर केला जाऊ शकतो.
मात्र, प्रत्येक बिअर मांसाहारी नसते. सर्व कंपन्या बिअर तयार करताना या पद्धतीचा वापर करत नाहीत. काही कंपन्या प्राणिजन्य घटकांचा वापर टाळतात. त्यामुळे बिअर शाकाहारी आहे की मांसाहारी, हे तिच्या उत्पादन प्रक्रियेवर अवलंबून असतं.
प्रतिक्रिया व्यक्त करा