अकोला जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १०३ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या नगरपालिक प्रशासन शाखेमार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, हिवरखेड आणि पातूर नगरपरिषद तसेच बार्शीटाकळी नगरपंचायत येथील रिक्त पदांचा या भरतीमध्ये समावेश आहे.
कोणती पदे भरली जाणार?
या भरतीत कनिष्ठ लिपिक, लघु टंकलेखक, वाहनचालक, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, गाळणी चालक, जोडारी, विजतंत्री, पंप ऑपरेटर, तारतंत्री, वाहनचालक कम ऑपरेटर आणि अग्निशामक अशी विविध पदे भरली जाणार आहेत.
अर्ज कसा करायचा?
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांना २६ नोव्हेंबर २०२६ ते १७ डिसेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२६ आहे. याच कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा