बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

शिवसेना खटला: गुवाहाटीत बसून व्हीप ठरवता येणार नाही, सिब्बल

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे, सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रतियुक्तीवादात शिंदे गटाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला.

शिवसेना खटला: गुवाहाटीत बसून व्हीप ठरवता येणार नाही, सिब्बल

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे, या खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता दिली होती, तर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही शिंदे यांना देण्यात आले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मागच्या तीन वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात होती. मात्र ऑगस्ट महिन्यापासून या खटल्याची नियमित सुनावणी सुरू झाली आहे. आधी उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला, त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी आपले मुद्दे मांडले. आता पुन्हा ठाकरे गटाकडून प्रतियुक्तीवाद सुरू असून कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत.

गुवाहाटीत बसून व्हीप ठरवता येणार नाही

गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला. विधिमंडळ पक्षनेता म्हणून शिंदे हे गुवाहाटीत बसून हे ठरवू शकत नाहीत, असे सिब्बल म्हणाले. विधानसभा अध्यक्ष नेमणे, विधिमंडळ नेता निवडणे आणि मुख्यमंत्री निवडणे याला आपला विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने पक्ष कोणाचा याचा निर्णय ज्या तारखेला दिला, ती तारीख महत्त्वाची असल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. शिंदे हे राजकीय पक्ष त्या तारखेपासून, म्हणजे फेब्रुवारी २०२३ पासून आहेत; त्यापूर्वी आम्हीच पक्ष होतो, असा युक्तीवाद त्यांनी केला.

हे बंड ठरवून केल्याचा आरोप

भारत गोगावले यांना व्हीप नियुक्त करणे आणि सुनील प्रभू यांना काढणे हे कोणत्या कायद्यानुसार आहे, असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे ते म्हणाले. ही फूट विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच झाली होती. यासाठीची तयारी पूर्वीच झाली होती आणि त्याला भाजपची मदत होती, असा आरोप सिब्बल यांनी केला.

निवडणूक आयोगाने आपल्याला कधीही नोटीस दिली नव्हती, असेही सिब्बल म्हणाले. संघटनेतील कुठल्याही गोष्टी किंवा रचना आयोगाने पाहिली नाही; आयोगाने फक्त विधिमंडळ सदस्यांची संख्या पाहून निर्णय घेतला, असा त्यांचा दावा आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance