आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. चाकण एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी हब परिसरातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी या पत्रातून लक्ष वेधले आहे.
चाकण एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी हब परिसरात वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वीज पुरवठा या पायाभूत सुविधांचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या उद्योजकांना आणि कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मासिक आढावा बैठकीची मागणी
या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दरमहा बैठक घेऊन आढावा घ्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. चाकण आणि हिंजवडी परिसरातील उद्योग व कर्मचाऱ्यांच्या अडचणींवर आता सरकार काय पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे.
Leave a Reply