दूध विकत आणल्यानंतर ते खराब होऊ नये म्हणून आपण लगेच फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही अनेकदा दूध लवकर खराब होतं. कधी दुधाची चव बदलते, तर कधी त्याला आंबट वास येऊ लागतो.
फ्रिजमधील जागा महत्त्वाची
फ्रिजमधील प्रत्येक भागाचं तापमान सारखं नसतं. काही ठिकाणी तापमान वारंवार बदलतं, तर काही भागांमध्ये थंडावा जास्त आणि स्थिर असतो. त्यामुळे दूध ठेवताना योग्य जागा निवडणं महत्त्वाचं आहे.
दूध कुठे ठेवावं?
दूध फ्रिजच्या सर्वात थंड आणि स्थिर तापमान असलेल्या भागात ठेवावं. तापमान वारंवार बदलणाऱ्या जागी ठेवलेलं दूध लवकर खराब होऊ शकतं. दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ लवकर वापरणंही ताजेपणासाठी महत्त्वाचं आहे.
Leave a Reply