बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया याच्या खासगी आयुष्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या व्यावसायिक वाटचालीबद्दल सगळ्यांना माहिती आहे, मात्र त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारसं कोणाला ठाऊक नाही. आता त्याच्या दुसऱ्या पत्नीची ओळख समोर आल्याने ही चर्चा आणखी रंगली आहे.
## सुभद्रेच्या भूमिकेतील अभिनेत्री
हिमेशची दुसरी पत्नी सोनिया कपूर हीच ३३ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर गाजलेल्या ‘श्री कृष्ण’ या मालिकेत सुभद्रेची भूमिका साकारत होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर वेगळी छाप पाडली होती. सोनियाची भूमिका फार मोठी नव्हती; ती अवघ्या तीनच भागांपुरती मर्यादित होती. तरीही तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
सोनिया कपूरने फक्त ‘श्री कृष्ण’ मालिकेतच नव्हे, तर इतर अनेक मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांमध्येही तिने दमदार भूमिका करत चाहत्यांचे मनोरंजन केले. त्यामुळे तिची स्वतःची अशी ओळख निर्माण झाली होती.
## ओळखीचे प्रेमात रूपांतर
अभिनय क्षेत्रात काम करत असताना सोनिया आणि हिमेश यांची ओळख झाली. ही ओळख हळूहळू प्रेमात बदलली. मात्र त्या वेळी हिमेश विवाहित होता. एवढेच नव्हे, तर हिमेश हा सोनियाच्या खास मैत्रिणीचा पती होता. दोघांनी जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर हिमेशने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि सोनियासोबत दुसरा संसार थाटला.
सध्या सोनिया चमकत्या दुनियेत सक्रिय नाही. मात्र हिमेश सोनियासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने पोस्ट करत असतो.
Leave a Reply