प्रेमसंबंध तुटणे ही कोणत्याही व्यक्तीसाठी भावनिकदृष्ट्या कठीण गोष्ट असते. बराच काळ एकत्र घालवल्यानंतर अचानक त्या व्यक्तीपासून दूर होणे सोपे नसते. अशा वेळी स्वतःला सावरण्यासाठी कोणताही ठराविक उपाय नसला, तरी काही सवयी मनाला सावरण्यास मदत करू शकतात.
ब्रेकअपनंतर अनेकांना नेमके काय करावे हेच समजत नाही. अशा परिस्थितीत स्वतःकडे लक्ष देणे सर्वात गरजेचे असते.
भावना स्वीकारा, स्वतःला वेळ द्या
ब्रेकअपनंतर स्वतःच्या भावनांचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. स्वतःला सावरण्यासाठी पुरेसा वेळ द्या. जुन्या आठवणींपासून काही काळ दूर राहून स्वतःच्या आवडीनिवडी आणि छंदांना वेळ द्या. स्वतःला वेळ दिल्याने मन हळूहळू स्थिर होण्यास मदत होते.
आरोग्याची काळजी घ्या
मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवा. मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे या काळात तितकेच महत्त्वाचे आहे. जवळच्या लोकांसोबत संवाद साधल्याने मन हलके होते आणि पुढे जाण्याची ताकद मिळते.
Leave a Reply