मराठी अभिनेत्री सुषमा जयवंत सध्या झी मराठी वाहिनीवरील कमळी या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे.
आधी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय
सुषमा म्हणाली की, आम्ही दोघेही घटस्फोटित आहोत. त्यामुळे आम्हाला कोणताही तामझाम नको होता. आम्ही ३८ वर्षांचे होतो, त्यामुळे आमचे खूप वय झालेले. म्हणून पुन्हा त्याच गोष्टी करायची आमची इच्छाच नव्हती. आमचे लिव्ह-इनमध्ये राहायचे ठरले. तिच्या सासऱ्यांनी लिव्ह-इनला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही खूप साध्या पद्धतीने लग्न केले.
दुसऱ्या लग्नाआधी भीती वाटली
दुसरे लग्न करण्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, खूप भीती वाटलेली. सगळे काही संपले असे वाटलेले. त्यामुळे दुसरे लग्न करण्याआधी ती कुणालला म्हणाली, जर पुन्हा असे काही झाले, तर मी कोलमडेन. पण कुणाल म्हणाला, मी तुला सांभाळून घेईन. बाबानंतर कोणी आपल्यावर इतके प्रेम करणारे भेटले, तर तुम्ही लग्नाचा विचार करायला काही हरकत नाही, असे सुषमाने पुढे सांगितले. ही मुलाखत तिने राजश्री मराठीला दिली होती.
Leave a Reply