मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली. पुण्यात साहित्य महामंडळाची बैठक पार पडली.

शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. पुण्यात आज साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. थोड्याच वेळात याबाबत पत्रकार परिषद होणार असून त्यामध्ये त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

चार दिवसांचे संमेलन जानेवारी २०२७ मध्ये

हे चार दिवसीय संमेलन २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२७ या काळात पार पडण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले जात आहे. पुणे विद्यापीठात प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

कोण आहेत शरणकुमार लिंबाळे?

शरणकुमार लिंबाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आतापर्यंत ४० पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले आहे. ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. दलित साहित्याच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणूनही ते ओळखले जातात. ‘अक्करमाशी’ या आत्मकथेमुळे त्यांना साहित्यविश्वात विशेष प्रसिद्धी मिळाली. सामाजिक विषमता, जातिव्यवस्था आणि वंचितांचे प्रश्न त्यांनी आपल्या लेखनातून सातत्याने मांडले आहेत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या याच योगदानाची दखल घेत शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance