दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशाने डंखविरहित मधमाश्यांना कायदेशीर हक्क बहाल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. निसर्ग संवर्धनाच्या इतिहासात हे पाऊल एक सुवर्णपान ठरले आहे. जगातील कोणत्याही कीटकाला अशा प्रकारे कायदेशीर संरक्षण आणि हक्क मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
केवळ पाच मिलिमीटर लांबीच्या मधमाश्या
जगभरात डंखविरहित मधमाश्यांच्या सहाशेहून अधिक प्रजाती आढळतात. त्यापैकी एकशे पंचाहत्तरहून अधिक प्रजाती एकट्या पेरूमध्ये आहेत. या मधमाश्या केवळ पाच मिलिमीटर लांबीच्या असतात आणि स्वसंरक्षणासाठी त्या डंख मारू शकत नाहीत.
अस्तित्वावर आलेले संकट
जंगलतोड, कीटकनाशकांचा अतिवापर आणि हवामान बदलामुळे या मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते. हे संकट लक्षात घेऊनच त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. पेरूच्या या निर्णयामुळे निसर्गातील छोट्या जीवांच्या संरक्षणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
Leave a Reply