भारतीय लग्नांमध्ये नवरदेव मंडपात येण्याआधी पांढऱ्या रंगाच्या घोडीवर बसून येतो. ही त्याची खास एन्ट्री असते. लग्नाच्या वरातीत नवरदेव लग्नाच्या पोशाखात घोडीवर बसतो आणि त्याच्यासोबत एक लहान मुलगा किंवा मुलगीही बसते. ही परंपरा फार जुनी आहे आणि तिच्यामागे काही महत्त्वाची कारणे सांगितली जातात.
घोडीच का, घोडा का नाही?
घोड्याचा स्वभाव आक्रमक असतो, तर घोडीचा स्वभाव शांत असतो. त्यामुळे घोडीला सांभाळणे सोपे जाते. लग्नासारख्या गर्दीच्या आणि आनंदाच्या प्रसंगी कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होऊ नये, यासाठी घोडीचा वापर केला जातो. शांत स्वभावामुळे घोडीवर बसणे सुरक्षित मानले जाते.
पांढऱ्या रंगामागील अर्थ
लग्नात पांढरा रंग शुभ आणि पवित्र मानला जातो. शास्त्रात पांढऱ्या घोडीला प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नवरदेवाला पांढऱ्या घोडीवर बसवले जाते. घोडीवर बसण्याच्या या विधीला वराच्या जबाबदारीचे प्रतीक म्हणूनही मानले जाते. लग्नानंतर नवीन नातेसंबंध आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात आणि त्याची सुरुवात म्हणून हा विधी केला जातो.
Leave a Reply