नीम करौली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने जगभरात सुमारे ४५२.८६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट अवघ्या सुमारे २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. चित्रपटाच्या यशानंतर कलाकारांच्या मानधनाबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या. त्यात मुख्य भूमिकेतील शोभिनव सत्याला १५ लाख रुपये मानधन मिळाल्याचा दावाही करण्यात आला होता.
१५ लाखांचा दावा खोटा
शोभिनव सत्याने हा दावा स्वतःच खोटा ठरवला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की त्याला १५ लाख रुपये मिळालेले नाहीत. त्याचं प्रत्यक्ष मानधन ५० हजार ते १ लाख रुपयांच्या दरम्यान होतं. त्याने असंही सांगितलं की चित्रपटात त्याने सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं आणि त्यासाठी त्याला वेगळं मानधन देण्यात आलं होतं.
स्विगी डिलिव्हरीपासून चित्रपटापर्यंत
शोभिनवने चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यापूर्वी स्विगीमध्ये डिलिव्हरीचं काम केल्याचंही सांगितलं. एक दिवस पूर्ण काम केल्यानंतर त्याला सुमारे ५०० रुपये मिळाले होते, तर एकदा चुकीमुळे त्याला २ हजार रुपयांचा दंडही भरावा लागला होता. ‘हनुमान अंश’ २७ नोव्हेंबरपासून सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
Leave a Reply