प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या अल नीनोच्या प्रभावामुळे भारतासह संपूर्ण भारतीय उपखंडाला हवामानाच्या तीव्र संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा हवामानविषयक अहवालांतून देण्यात आला आहे.
सुपर अल नीनोची शक्यता
आगामी काळात अल नीनोचे रूपांतर सुपर अल नीनोमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दशकांतील ही सर्वाधिक तीव्र स्थिती ठरू शकते, असे अहवालांत म्हटले आहे.
या परिस्थितीमुळे काही भागांत अतिवृष्टी आणि पूर येण्याची, तर अन्य भागांत दुष्काळ आणि पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही दुष्काळसदृश परिस्थितीची चिन्हे दिसू लागली आहेत.
तीन संस्थांचा संयुक्त अभ्यास
काठमांडूस्थित आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वतीय विकास केंद्र (आयसीआयएमओडी), बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटी आणि चिनी विज्ञान अकादमीच्या संस्थेने संयुक्तपणे हा अभ्यास तयार केला आहे.
Leave a Reply