मालवण-तारकर्ली गावचे सुपुत्र गोविंद उर्फ बंटी केरकर यांनी क्रिकेटच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेतली आहे. बेंगळुरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील आयएससीएल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वासाठी त्यांची पंच म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे मालवणसह तारकर्ली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२५ नोव्हेंबरपासून स्पर्धा
ही स्पर्धा २५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत बेंगळुरू येथील आचार्य स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावर पंचगिरीची संधी
आयएससीएल स्पर्धेचे हे दुसरे पर्व असून देशभरातील संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील या मोठ्या स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याची संधी केरकर यांना मिळाली आहे.
Leave a Reply