जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंचे दर सातत्याने खाली येताना दिसत आहेत. दर कमी होत असल्याने अनेकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.
७२ तासांत किती घसरण?
गेल्या ७२ तासांत सोन्याच्या दरात ७ हजार रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात १० हजार रुपयांची घसरण झाली आहे. आठवड्याभरापासून जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या दरात सतत घसरण होताना दिसत आहे.
आजचे दर
आज, २२ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख २७ हजार २०५ रुपये आहे. तर दुसरीकडे एक किलो चांदीचा दर जीएसटीसह १ लाख ५८ हजार ६२० रुपये झाला आहे. सध्या सोने आणि चांदी दोन्ही वर्षभरातील सर्वात कमी पातळीवर आहेत. त्यामुळे बाजारात ग्राहकांची चांगली गर्दी पाहायला मिळत आहे.
Leave a Reply