पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना कडक इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी राजकीय नेत्यांनाही त्यांनी खडसावले होते आणि आता व्यावसायिकांनाही त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.
कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त
अतिक्रमणाविरोधातील कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाई सुरू झाल्याचे समजताच अनेक दुकानदारांनी स्वतःहून आपल्या दुकानांसमोरील शेड काढून टाकल्या. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
आयुक्तांनी व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अतिक्रमण करून सार्वजनिक जागा अडवणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात अतिक्रमणाविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply