नेपाळमध्ये फिरायला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राकेश नावाचा नेपाळी तरुण भेटला. या तरुणाने अस्खलित मराठीत संवाद साधत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पर्यटकांनी हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक नेपाळी तरुण चक्क शुद्ध मराठी बोलताना दिसतो आणि त्याच्या मराठीची सोशल मीडियावर प्रशंसा केली जात आहे.
पुण्यात राहिल्याचा परिणाम
व्हिडिओमध्ये फिरायला गेलेले महाराष्ट्रातील पर्यटक राकेश नावाच्या नेपाळी तरुणाला भेटतात. त्याला मराठीत नाव विचारतात आणि त्याचे मराठी ऐकून हे पर्यटक आश्चर्यचकित होतात. त्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटक त्याच्याबरोबर मराठीमध्येच बोलू लागतात. राकेश याआधी पुण्यात राहत होता, त्यामुळे त्याचे मराठी इतके शुद्ध आहे, असे व्हिडिओमधून दिसते. तो स्वतः सांगतो, ‘माझं नाव राकेश, मी महाराष्ट्रात पुण्यात राहत होतो.’
‘जय महाराष्ट्र’ म्हणत निरोप
‘पुणे सोडून मी इथे आलो, परत कधी गेलो नाही’, असे हा नेपाळी तरुण बोलू लागला. यावर महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी त्याला विचारले, ‘परत आमच्या सोबत येतोस का?’ त्यावर त्याने हसत उत्तर दिले, ‘येतो ना.’ नंतर ‘जय महाराष्ट्र’ बोलत आणि ‘गणपती बाप्पा’ म्हणत त्याने तिथून निरोप घेतला. या व्हिडिओला सोशल मीडियावर १.३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले असून अनेकांनी त्याच्या मराठीचे कौतुक केले आहे. परदेशात मराठी बोलणारा भेटल्यावर छान वाटते, अशा प्रतिक्रिया सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दिल्या आहेत.
Leave a Reply