शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

‘आदि अनंत’ची पहिल्याच आठवड्यात २.१६ कोटींची कमाई

अशोक सराफ यांच्या 'आदि अनंत'ने पहिल्याच आठवड्यात २.१६ कोटी कमावले असून १ लाख २५ हजारांहून तिकिटं विकली गेली आहेत. २०० चित्रपटगृहांत २५० हून अधिक शो सुरू आहेत.

‘आदि अनंत’ची पहिल्याच आठवड्यात २.१६ कोटींची कमाई

सध्या बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटांची गर्दी पाहायला मिळत आहे. या चित्रपटांच्या गर्दीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या ‘आदि अनंत’ चित्रपटाने आपलं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.

पहिल्या आठवड्यातील कमाई

‘आदि अनंत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने तब्बल २.१६ कोटी रुपयांची कमाई केली असून, महाराष्ट्रात १ लाख २५ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री केली आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता चित्रपटाच्या शोमध्येही वाढ करण्यात आली आहे.

२५० हून अधिक शो

पाच मराठी चित्रपटांची स्पर्धा असतानाही ‘आदि अनंत’ने दुसऱ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. सध्या महाराष्ट्रातील सुमारे २०० चित्रपटगृहांत २५० हून अधिक शोंसह चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसवरील सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

आजोबा आणि नातवाच्या नात्यातील भावनिक बंध, त्यांच्यातील मतभेद, संवाद, प्रेम आणि एकमेकांसाठी असलेली ओढ या सगळ्याची हृदयस्पर्शी मांडणी चित्रपटात करण्यात आली आहे. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या अभिनयातील सहजता, त्यांच्यातील सुंदर केमिस्ट्री आणि भावनिक प्रसंगांची प्रभावी मांडणी प्रेक्षकांना विशेष भावत आहे. केवळ मनोरंजन न करता नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीव करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी कथा अनुभवायला देत आहे.

व्हायरल व्हिडीओने वेधलं लक्ष

अशोक सराफ हे कायम त्यांच्या साधेपणामुळे ओळखले जातात. त्यांनी कधीही बडेजाव केला नाही. मात्र समाजमाध्यमावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या व्हिडीओत अशोक सराफ थेट लॅम्बोर्गिनीमध्ये येऊन बसतात आणि गाडी घेऊन तेथून निघून जातात. हा व्हिडीओ पाहून अनेकजण चकीत झाले होते. अशोक सराफ यांनी इतकी महागडी गाडी कधी घेतली, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. मात्र तो व्हिडीओ एआयने तयार केलेला होता.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance