भारतीय सिनेमाइतकीच भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीही मोठी आहे. आज प्रत्येक मोठा स्टार टेलिव्हिजनवर होस्टिंग करताना किंवा एखाद्या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसतो. मात्र, टेलिव्हिजनच्या सर्वांत महागड्या होस्टचा विषय निघाला की, सगळ्यांसमोर दोनच नावं येतात. एक म्हणजे ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खान आणि दुसरं म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’चे अमिताभ बच्चन. अनेक वर्षांपासून या दोन मोठ्या स्टार्सचा टेलिव्हिजन क्षेत्रावर दबदबा कायम आहे. मात्र, आता या यादीत एक असं नाव समोर आलं आहे, ज्याने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
सर्वांत महागडा होस्ट रोहित शर्मा?
मिळालेल्या माहितीनुसार, ना सलमान खान, ना अमिताभ बच्चन, तर टॉप आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या होस्टच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माचं नाव जोडलं गेलं आहे. क्रिकेटच्या मैदानावर कायम सिक्सर मारणाऱ्या ‘हिटमॅन’ रोहित शर्माने सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या शोच्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या जगतात पदार्पण केलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा या शोचा प्रत्येक एपिसोड होस्ट करण्यासाठी जवळपास १० ते १५ कोटी रुपये घेतो. मात्र, हा केवळ एक अंदाज आहे. या संदर्भात रोहित शर्मा किंवा वाहिनीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सलमान खान आणि अमिताभ बच्चन किती घेतात?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोची शान मानला जाणारा सलमान खान त्याच्या मानधनामुळे सतत चर्चेत असतो. अंदाजानुसार, सलमान साधारण ८ ते १० कोटी रुपये घेतो. तर, अमिताभ बच्चन २००० सालापासून ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करत आहेत. वृत्तांनुसार, अमिताभ बच्चन प्रत्येक एपिसोडचे २.५ ते ३ कोटी रुपये घेतात, असा अंदाज आहे.
हे सर्व आकडे केवळ अंदाजावर आधारित आहेत. त्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Leave a Reply