उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सभेदरम्यान मिळाली दुःखद बातमी
गोरखपूरमधील एका सभेला संबोधित करत असतानाच योगी आदित्यनाथ यांना आईच्या निधनाची बातमी मिळाली. या बातमीने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पौडीला जाणार का, अद्याप स्पष्ट नाही
कोविड काळात वडिलांच्या अंत्यसंस्काराला योगी आदित्यनाथ उपस्थित राहू शकले नव्हते. आता आईच्या निधनानंतर ते पौडीला जाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी नुकतीच आईची भेट घेतली होती.
Leave a Reply