मुंबईत लोकल प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. भांडुप ते कांजूरमार्ग या दरम्यान रेल्वे रुळात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या गाड्या जागच्या जागी थांबल्या आणि लोकलची वाहतूक विस्कळीत झाली.
गाड्या पाऊण तास एकाच जागी
रुळातील बिघाडामुळे गाड्या पाऊण तास एकाच जागी उभ्या राहिल्या. त्यामुळे गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. नेहमीच्या वेळेवर पोहोचणे प्रवाशांना शक्य झाले नाही.
प्रवाशांना रुळांवरून चालण्याची वेळ
गाड्या पुढे सरकत नसल्याने अनेक प्रवाशांनी रुळांवरून चालत जाण्याचा मार्ग निवडला. या बिघाडामुळे मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना विलंब सहन करावा लागला.
Leave a Reply