गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

निषेधाच्या नादात बाळासाहेबांचा फोटो फाडला, महापालिकेत वाद

सोनिया गांधींच्या पुस्तकाविरोधातील निषेधात शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला. ठाकरेसेनेने महापालिकेत जोरदार निषेध नोंदवला.

निषेधाच्या नादात बाळासाहेबांचा फोटो फाडला, महापालिकेत वाद

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत शिंदेसेनेने पत्रकार परिषदेत निषेध व्यक्त केला. मात्र निषेधाची दखल घेतली जावी म्हणून शिंदेसेनेच्या नेत्यांनी भर पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रतीच फाडल्या. निषेधासाठी पुस्तक फाडण्याचा हा प्रकार शिंदेसेनेच्याच अंगलट आला.

पुस्तक फाडण्याच्या नादात शिंदेसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडला. मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन केले होते. त्याच आंदोलनातील फोटो दाखवत शायना एनसी यांनी तो फोटो भर पत्रकार परिषदेत फाडला.

शिंदेसेनेने सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात सावरकरांचा अपमान झाल्याचा आरोप केला होता आणि त्याचाच निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. पुस्तकाच्या प्रती फाडताना शायना एनसी यांनी बाळासाहेबांच्या जोडे मारो आंदोलनातील फोटो दाखवला आणि तोही फाडला. त्यामुळे निषेधाचा मुद्दा बाजूला राहून फोटो फाडण्याची घटना चर्चेचा केंद्रबिंदू ठरली.

व्हिडिओ समोर येताच टीकेची झोड

या घटनेचे व्हिडिओ समोर येताच ठाकरेसेना आणि काँग्रेसने शिंदेसेना आणि शायना एनसी यांच्यावर टीकेची झोड उठवली. तर उत्साहाच्या भरात अशा चुका करू नये, असा सल्ला देत भाजपने शिंदेसेनेच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. सगळीकडून टीका झाल्यानंतर शायना एनसी यांनी फोटो फाडल्याच्या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मात्र तरीही ठाकरेसेनेच्या नगरसेवकांनी यावरून मुंबई महापालिकेत जोरदार निषेध नोंदवला. महापालिकेत शायना एनसी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. महापालिका सभागृहातही ठाकरेसेनेच्या नगरसेवकांची महापौरांसोबत जोरदार खडाजंगी झाली.

उपमुख्यमंत्र्यांनाही दखल घ्यावी लागली

हे प्रकरण अंगाशी आल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याची दखल घ्यावी लागली आहे. ही चूक अजाणतेपणाने झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असला, तरी विरोधकांना शिंदेसेनेला घेरण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे.

त्यामुळे निषेध करायला गेले आणि स्वतःचेच हसू झाले, अशीच स्थिती शिंदेसेनेच्या शायना एनसी यांची झाली आहे. सोनिया गांधी यांनी पुस्तकाच्या रूपात का असेना, शिंदेसेनेला घेरण्यासाठी ठाकरेसेनेला मदतच केल्याची चर्चा आता राजकीय विश्वात रंगू लागली आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance