१७७० कोटी रुपयांची मालकीण असलेली अनन्या बिरला ही कायम चर्चेत असते. नुकताच तिच्या आलिशान घराची झलक समोर आली आहे आणि सध्या सोशल मीडियावर तिच्या घराची जोरदार चर्चा सुरू आहे. तिचे घर पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
अनन्या बिरला ही प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिरला यांची मुलगी आहे. ती गायिका आणि उद्योजिका म्हणून ओळखली जाते. तिच्या लग्झरी आयुष्याची कायमच चर्चा सुरू असते. नुकताच बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर फराह खान हिने अनन्याच्या घराची झलक दाखवली.
राजवाड्यासारखे घर
फराह खान सध्या आपल्या युट्यूब व्ह्लॉगद्वारे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची आणि त्यांच्या घरांची झलक दाखवत असते. ती नुकतीच अनन्या बिरला यांच्या मुंबईतील भव्य घरी पोहोचली. अनन्याचे घर हे एखाद्या राजवाड्यासारखे असल्याचे दिसत आहे.
अनन्या बिरलाच्या घराची भव्यता, अप्रतिम इंटीरियर, मौल्यवान कलाकृती आणि जुन्या काळातील इंटिरिअर पाहून फराही थक्क झाली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लक्झरी आणि क्लासिक डिझाइनचे असे मिश्रण दिसले आहे.
बंगल्यातील वॉर्म लाइट आणि वुडन फर्निचर
अनन्याच्या संपूर्ण बंगल्यात वॉर्म लाइट आणि वुडन फर्निचर असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. घरातील स्वयंपाक घर हे आधुनिक आहे. फिकट हिरव्या रंगाचे इंटिरिअर आणि पांढऱ्या रंगासोबत ते अतिशय सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर अनन्या बिरलाच्या घराची जोरदार चर्चा सुरू आहे.
Leave a Reply