राज्यातील वातावरणात बदल होत असून, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान या भागांतील अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो.
जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस
या काळात जोरदार वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलण्याची आणि हवामानात बदल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पावसाच्या अंदाजाकडे लक्ष
पावसाच्या या अंदाजाकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या पुढील अंदाजानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.
Leave a Reply