गौतमी पाटील आली म्हटल्यानंतर गर्दी तर होणारच. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी जमली होती. गौतमीला पाहिल्यानंतर सर्वत्र एकच नारा असतो, तो म्हणजे ‘सबसे कातिल गौतमी पाटील’.
पाहण्यासाठी झाडावर चढले तरुण
कार्यक्रमाच्या ठिकाणी एवढी गर्दी जमली होती की अनेकांना गौतमी पाटील दिसत नव्हती. त्यामुळे काही तरुण थेट झाडावर चढले. गौतमीला एकदा पाहण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली.
कार्यक्रमाचे फोटो व्हायरल
गौतमी पाटील यांच्या या कार्यक्रमाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी जमलेली प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
Leave a Reply