पेन्शनधारकांसाठी १९ नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची महत्त्वाची बैठक त्या दिवशी होणार आहे. या बैठकीआधी पेन्शनधारकांच्या संघटनेने हायर ईपीएस पेन्शनचे क्लेम सतत रिजेक्ट होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. क्लेम नाकारले जाऊ नयेत आणि पेन्शनधारकांना न्याय मिळावा, यासाठी संघटनेने १० प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
क्लेम नाकारले जाण्याचा मुद्दा
हायर पेन्शनसाठी अर्ज करणाऱ्या अनेक पेन्शनधारकांचे क्लेम नाकारले जात असल्याची तक्रार संघटनेने केली आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेने १० मोठ्या मागण्या समोर ठेवल्या आहेत.
बैठकीकडे पेन्शनधारकांचे लक्ष
नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ पेन्शनर्स असोसिएशन्स या संघटनेने ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीसाठी एकूण २२ मागण्या मांडल्या आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या १० मागण्यांवर बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे देशभरातील पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply