बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दाऊदचं घर जमीनदोस्त होणार; मशिदीबाबत नागरिकांची विनंती

मुंबईतील भेंडी बाजारातील दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर जमीनदोस्त होणार आहे. तळमजल्यावरील शंभर वर्षे जुन्या मशिदीबाबत स्थानिक नागरिकांनी विनंती केली आहे.

दाऊदचं घर जमीनदोस्त होणार; मशिदीबाबत नागरिकांची विनंती

मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेनमध्ये असलेली हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही जीर्ण आणि धोकादायक इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर आणि त्याचे कार्यालय आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही तोडक कारवाई पार पडणार आहे. मात्र या इमारतीच्या तळमजल्यावर असलेला प्रार्थना हॉल आणि मशीद यांचा मुद्दा आता चर्चेत आला आहे.

मशिदीबाबत स्थानिकांची भूमिका

एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, ही इमारत गेल्या काही महिन्यांपासून खाली आहे. वरच्या मजल्यांवर भाडेकरू राहात होते, तेही आता निघून गेले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर सुमारे शंभर वर्षे जुनी मशीद आहे. या मशिदीला सी-वन कॅटेगरीची नोटीस देण्यात आली आहे, मात्र मशीद आतून पूर्णपणे चांगल्या स्थितीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वरचा भाग पाडण्याला आमचा विरोध नाही, पण बुलडोझर आणि यंत्रसामग्री लावल्यास मशिदीला धोका निर्माण होईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

वरचा भाग पाडायचा असेल तर तो हाताने, मॅन्युअली पाडावा, अशी त्यांची विनंती आहे. वरच्या मजल्यांवर कोणीही राहात नाही आणि कोणालाही धोका नाही, त्यामुळे मॅन्युअल पद्धतीने तोडकाम करण्यास कोणाचाही विरोध असणार नाही, असेही नागरिकांनी म्हटले आहे. तळमजल्यावरील मशिदीत लोक येतात, प्रार्थना करून आपापल्या घरी जातात, त्यामुळे मशिदीचे नुकसान होऊ नये, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आज महत्त्वाची बैठक; निर्णयाकडे लक्ष

मुसाफिरखाना परिसरातील मशिदीबाबत महापालिकेकडून आज महत्त्वाची बैठक होणार आहे. आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, बैठकीनंतर तोडक कारवाईबाबत निर्णय होणार आहे. या चर्चेमुळे परिसरात तणाव आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व आहे. महापालिका प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेणार आणि बैठकीनंतर नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance