मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

ट्रॅव्हिस हेड आयपीएल २०२७ मधून बाहेर; एसआरएचला मोठा धक्का

आयपीएल २०२७ पूर्वी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. ट्रॅव्हिस हेडने पुढील हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला असून कामाचा ताण हे त्यामागचे कारण आहे.

ट्रॅव्हिस हेड आयपीएल २०२७ मधून बाहेर; एसआरएचला मोठा धक्का

आयपीएल २०२७ पूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने पुढील हंगामातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच तो पुढच्या हंगामात खेळताना दिसणार नाही. आयपीएल २०२७ साठी कायम ठेवलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर होण्यापूर्वीच ही मोठी बातमी समोर आली आहे.

लग्नानंतर काही दिवसांतच झटका

नुकतेच सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन आणि गायक अनिरुद्ध रविचंदर यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. ग्रीसमधील या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या दोघांनी पारंपारिक पद्धतीने लग्न न करता सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज या पद्धतीला प्राधान्य दिले. आता लग्नाच्या काही दिवसांतच काव्याला हा मोठा झटका बसला आहे.

इतक्या चांगल्या खेळाडूने संघाची साथ अचानक सोडल्याने मालकीण काव्या मारनला मोठा झटकाच बसला असणार. जर हेड खेळला नाही, तर चाहत्यांना ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांची आयपीएलमधील सर्वात स्फोटक सलामीची जोडीही मुकणार आहे.

माघारीमागचे कारण

ट्रॅव्हिस हेडच्या आयपीएल २०२७ मधील अनुपस्थितीचे कारण त्याच्यावरील कामाचा ताण आणि आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेडने सनरायझर्स हैदराबादला आपल्या निर्णयाबद्दल कळवले आहे. हेडच्या अनुपस्थितीमुळे केवळ संघाच्या फलंदाजीची फळीच रिकामी झाली नाही, तर गोव्यात १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी फ्रँचायझीच्या तिजोरीतही लक्षणीय वाढ होईल.

ट्रॅव्हिस हेड हा फ्रँचायझीने कायम ठेवलेल्या पाच आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंपैकी एक होता. फ्रँचायझीने त्याला १४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पुढील वर्षी आयपीएलनंतर होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ॲशेस आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही आहेत. या सर्व मोठ्या मालिका आणि स्पर्धा पाहता, ट्रॅव्हिस हेडचा निर्णय आश्चर्यकारक नाही. देशाला प्रथम प्राधान्य दिल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. त्याने आपल्या देशासाठी तब्बल १४ कोटी इतक्या मोठ्या रकमेवर सहज पाणी सोडले आहे. आज आयपीएल रिटेशनचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सर्व चाहत्यांचे लक्ष प्रत्येक संघाच्या भूमिकेकडे असणार आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance