मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

छटपूजेवरून पृथ्वीक प्रतापची खोचक पोस्ट चर्चेत

मुंबईतील छटपूजेवरून चर्चेदरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप याने सोशल मीडियावर गिरगाव चौपाटीचा उल्लेख करत खोचक पोस्ट केली आहे.

छटपूजेवरून पृथ्वीक प्रतापची खोचक पोस्ट चर्चेत

उत्तर भारतीय समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला छठपूजेचा सण मुंबईतील विविध समुद्रकिनारे आणि तलावांच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईतील छटपूजेवरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगताना दिसत आहे. सोशल मीडियावरही याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

पृथ्वीक प्रतापची खोचक पोस्ट

अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप याने केलेली एक खोचक पोस्ट चर्चेत आली आहे. पृथ्वीक प्रताप सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असतो. यावेळी अभिनेत्याने सोशल मीडियावर ‘गिरगाब चवपाटी…!’ असे लिहिले आहे. गिरगाव चौपाटीचा उल्लेख करत त्याने केलेल्या या पोस्टमधून छटपूजेच्या मुद्द्यावर खोचक टिप्पणी केल्याचे दिसत आहे.

पृथ्वीकची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली असून वापरकर्त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance