मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’वरून वाद; दीपाली सय्यद संतापल्या

आगामी चित्रपटावरून सुरू असलेला वाद तापला आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी सेन्सॉर मंडळावर दबाव येत असल्याचा आरोप करत चित्रपटाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’वरून वाद; दीपाली सय्यद संतापल्या

आगामी चित्रपटावरून सुरू असलेला वाद आता अधिकच तापला आहे. या चित्रपटाला विरोध होत असल्याचा आरोप करत अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. महिलांच्या शोषणाविरोधात बनवला जाणारा चित्रपट असल्याचा दावा करत त्यांनी त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

सेन्सॉर मंडळावर दबावाचा आरोप

दीपाली सय्यद यांच्या म्हणण्यानुसार, रुपाली चाकणकर यांच्यामुळे सेन्सॉर मंडळाला प्रचंड त्रास होत आहे. चित्रपटाला विरोध करण्यासाठी सेन्सॉर मंडळाकडे जाण्यात येत असल्याचे आम्हाला सांगितले जात आहे, असा त्यांचा दावा आहे. चित्रपट आणू नका, असेही आम्हाला सांगितले जात असल्याचे त्यांनी म्हटले. सेन्सॉर मंडळाला ‘कुणाची ताकद मोठी ते बघुयात’ असे सांगितले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महिलांचे शोषण करणाऱ्या व्यक्तीविरोधात चित्रपट बनवला जात असेल, तर त्याला पाठिंबा मिळायला हवा, असे दीपाली सय्यद म्हणाल्या. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्या काळात जर त्यांनी असा हंगामा केला असता, तर अनेक महिलांचे शोषण थांबले असते, असेही त्यांनी नमूद केले.

नाव आणि साडीच्या ट्रेडमार्कवर प्रश्न

रुपाली चाकणकर यांच्या ट्रेडमार्क नोंदणीच्या मुद्द्यावर बोलताना दीपाली सय्यद यांनी साडी आणि नावाच्या ट्रेडमार्कवरही प्रश्न उपस्थित केले. साड्यांवर ट्रेडमार्क करणे म्हणजे आपण साड्या नेसायच्या नाही का, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात कोट्यवधी महिला साड्या नेसतात आणि कितीतरी मुलींची नावे रुपाली आहेत, मग हे असले ट्रेडमार्क कसे असते, असे त्या म्हणाल्या. या प्रकरणात अनेक संस्था विरोध करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

चित्रपट नेमका कशावर?

दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या माध्यमातून महिलांचे शोषण आणि भोंदूगिरीसारख्या विषयांवर भाष्य करण्यात येणार आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी त्यांचे नाव, फोटो आणि वैयक्तिक शैली परवानगीशिवाय वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

एखादी वाईट घटना घडल्यानंतर भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी काही प्रयत्न केले जातात. मात्र, अशा वेळी अनेक अडथळे निर्माण होतात, असे दीपाली सय्यद म्हणाल्या. तरीही चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘मी या महाराष्ट्रात राहते. या महाराष्ट्राने मला खूप काही दिले आहे. मग या जन्मभूमीवर आणि कर्मभूमीवर आपण चुकीच्या गोष्टी कशा खपवून घेणार,’ असे म्हणत त्यांनी चित्रपटाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. प्रेक्षकांनी आधी चित्रपट पाहावा आणि त्यानंतर त्यावर बोलावे किंवा विरोध करावा, असेही त्या म्हणाल्या. आता दीपाली सय्यद यांच्या या वक्तव्यावर रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance