हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सन याच्या कारकिर्दीत एक वेगळे वळण आले आहे. ‘ट्रायलाईट’ आणि ‘द बॅटमॅन’ या त्याच्या चित्रपटांनी जगभरात धुमाकूळ घातला. आता तो जगप्रसिद्ध गुप्तहेर अर्थात जेम्स बाँडच्या भूमिकेत दिसणार आहे. डॅनियल क्रेगनंतर नवा 007 म्हणून रॉबर्ट येत असल्याने चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी त्याच्या खासगी आयुष्यातही मोठे वळण आले आहे आणि त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
सुकी वॉटरहाऊस कोण आहे?
रॉबर्ट पॅटिन्सन गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटिश गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल सुकी वॉटरहाऊस हिला डेट करत आहे. 34 वर्षीय सुकीचा जन्म पश्चिम लंडनमध्ये झाला आहे. तिने अवघ्या 16 व्या वर्षी मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात केली. तिने बरबरी, टॉमी हिलफिगर आणि ह्युगो बॉस यांसारख्या जागतिक फॅशन ब्रँडसाठी काम केले आहे. मॉडेलिंगसोबतच सुकीने ‘लव्ह, रोझी’, ‘इनसर्जेंट’ आणि ‘डिटेक्टिव्ह पिकाचू’ यांसारख्या चित्रपटांतून अभिनय केला आहे. ती एक यशस्वी इंडी-पॉप गायिका असून टेलर स्विफ्टच्या एरास दौऱ्यातही तिने कामगिरी बजावली आहे.
2018 पासूनची कहाणी
रॉबर्ट आणि सुकी यांची पहिली भेट 2018 मध्ये लॉस एंजेलिसमधील एका गेम नाईट दरम्यान झाली होती. जुलै 2018 मध्ये त्यांचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले. त्यानंतर त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर या जोडप्याने डिसेंबर 2023 मध्ये साखरपुडा केला. मार्च 2024 मध्ये सुकीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अशाप्रकारे लग्नापूर्वीच हे दोघे एका मुलीचे पालक झाले.
लग्न का रखडले?
गेल्या अनेक वर्षांपासून हे जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. साखरपुडा होऊनही या जोडप्याने अद्याप लग्न का केले नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. एका मुलाखतीत बोलताना सुकी वॉटरहाऊसने त्यावर मत प्रदर्शित केले. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच दोघांचेही चित्रपटांचे शूटिंग आणि म्युझिक टूरचे वेळापत्रक यामुळे दोघेही व्यग्र आहेत. कामाच्या या धावपळीत संतुलन साधण्यासाठी त्यांनी सध्या लग्न पुढे ढकलल्याची माहिती तिने दिली. आता रॉबर्ट पॅटिन्सन जेम्स बाँडच्या नवीन मालिकेत दिसणार असल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे.
Leave a Reply